मंचर बाजार समितीमध्ये मेथीचे बाजारभाव कडाडले   

मंचर, (प्रतिनिधी) : मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकर्‍यांनी विक्रीसाठी आणलेल्या मेथी पिकाचे बाजारभाव कडाडले आहे. ४४ रुपये जुडी या भावाने मेथीची विक्री झाल्याची माहिती मंचर बाजार समितीचे सभापती निलेश स्वामी थोरात यांनी दिली. 
 
कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर येथे बुधवारी रात्री भाजीपाला लिलावच्या वेळेस मे. आराध्या ट्रेडिंग कंपनी व गुरुकृपा ट्रेडिंग कंपनी राजू वाबळे व प्रशांत सैद यांच्या अडत गळ्यावर सिद्धेश संजय भालेराव कळंब या शेतकर्‍याच्या मेथीला सर्वाधिक  उच्चांकी बाजारभाव प्रति जुडी रुपये ४४ रूपये असा बाजारभाव मिळाला. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.मंचर बाजार समितीत चार तालुक्यांमधील शेतीमाल विक्रीसाठी येत असतो, कोथिंबिरीला प्रति जुडी २१ रूपये व शेपू प्रतिजुडी २२ रूपये असा बाजार भाव मिळाला, शेतकर्‍यांनी आपला भाजीपाला मंचर बाजार समितीत विक्रीसाठी आणावा, असे आवाहन बाजार समितीचे उपसभापती सचिन पानसरे यांनी केले. गेल्या एक महिन्यापासून चालू असलेल्या पावसामुळे तरकारी पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे, त्यामध्ये विशेषतः मेथी पिकाचे हे नुकसान झाले. नुकसानीतून ज्या शेतकर्‍यांचे तरकारी माल वाचले. त्यांना चांगला बाजारभाव मिळत असल्याचे सांगण्यात आले. 

Related Articles